Satara District Badminton Association | Office - Chh. Shahu Stadium, Room No.6, Satara 415 001, MH. INDIA

सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन विषयी

सातारा स्थिती पहिली क्रीडा संस्था म्हणून सातारा जिल्हा बॅमिंटन असोसिएशन ओळखले जाते. बॅडमिंटन खेळ साता-यान १९३० पासून खेळला जातोयाचा उल्लेख विविध ठिकाणी आला आहे. अर्थात त्यावेळी बॅमिंटन मैदानावर नेट बांधून खेळला जात असे नंतर न्यू इंग्लिश स्कूल व्यायाम मंडळ, शाहू स्टेडीयम, यूनियन क्लब या ठीकाणी हॉलमध्ये खेळ सुरु झाला १९५० मध्ये आर. डी. वसगडेकर यांच्या पुढाकाराने सातारा जिल्हा बॅमिंटन असोसिएशनची रीतसर स्थापना करण्यात झाली. असोसिएशन चे पहिले अध्यक्ष म्हणून बाळासाहेब लांजेकर तर उपाध्यक्ष म्हणून हरिभाऊ महाजन यांनी कार्यभार स्विकारला बॅमिंटनच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होऊलागल्या. १९५४-५५ मध्ये साताऱ्यात पहिली जिल्हा अजिंक्यपद बॅमिंटन स्पर्धा झाली
शाहू स्टेडियम मध्ये राज्य क्रीडा स्पर्धेच्या निमिताने हॉलचे नूतनीकरण झाले व ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्येचे पहिले विजेतेपद मिळव प्रकाश पदुकोण यांनी या हॉलचे उद्‌घाटन केले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, खेळाडू व कर सल्लागार अरुण गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तात्या बडके, मधू जोशी, चंद्रकांत माजगावकर यांनी यात पुढाकार घेतला. १९७४-७५ मध्ये सातारा जिल्हा बॅमिंटन असोसिएशनची रीतसर नोंदणी केली रा. ल. पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश महाजनी, अरुण गोडबोले, संजय देशपांडे, पी पी. जी. शहाणे मधुकर जोशी व सुरेश ढोंबरे यांनी बॅमिंटनच्या जडण घडणीची सुरवात केली. त्यानंतर १९७७ साली साताऱ्यात प्रथमच महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून उदय पवार, सुजाता जैन, सतपाल रावत, के. के. चित्रा, मानिकी केळकर, अमिता कुलकर्णी, रमेश नाबर या मान्यवर खेळाडूंचा खेळ सातारकरांनी पाहिला आणि बॅमिंटन खेळाच्या प्रचार व प्रसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
१९७५ साली डॉ. आठलये, मामा महाजनी, व्ही. के. कुलकर्णी, डॉ. पा. कोल्हटकर यांनी पुढाकार घेऊन संस्थेचा रोवलेला पाया या स्पर्धनंतर अधिकच मजबूत झाला. डॉ. पारंगे यांच्यानंतर संस्थेचा कार्यभाग ह. आ. महाडिक यानी स्विकारला त्यांनी कॅच देम यंग हि योजना राबवली. सायंकाळी ६ ते ८ या वेळात लहान मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांनी १०० हुन अधिक नवोदित खेळाडूना प्रोत्साहन दिले. त्याचे परिणाम १९८१ मध्ये महाराष्ट्र राज्य महिला क्रीडा स्पर्धेत पहावयास मिळाले. स्नेहल डिके, माधुरी माजगावकर, स्मिता लिमये व सरोज रासम यांच्या संघाने तृतिय स्थान पटकावले त्यानंतर जयदीप महाजनी, राजू बढ़िये, संग्राम पाटील, विक्रांत पाटील, बशीर सलाती, शरिफ सलाती, अरुण शर्मा, सुनील निगडीकर, प्रमोद शिंदे. अश्विनी महाजनी आदी खेळाडूंनी विविध स्पर्धात आपले कौशल्य दाखवले.
१९८१ नंतर १९८३ मध्ये असोसिएशनचे अध्यक्ष ह. आ. महाडीक, उपाध्यक्ष चंद्रकांत माजगावकर, प्रकाश कुलकर्णी, प्रा. संजीवनी माने, सौ. प्रितम महाजनी, आदीनी कुमार राज्यस्तरीय बॅडमेिटन स्पर्धाचे संयोजन केले. मयूर कोहली, राजीव बग्गा, अविनाश किराणे, हेमंत हर्डीकर, संजय फळणीकर, विनय बोस, अश्विनी तळवलकर, शीरीन गार्डा, सुषमा खांडेकर, मिना वडेर आदी कुमार खेळाडूनी केलेला बहारदार खेळ या वेळी सातारकरांनी अनुभवला
यानंतर सातत्याने जिल्हास्तरीय बॅडमिटन स्पर्धा सातत्याने होऊ लागल्या. ह. आ. महाडिक यांच्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्याकडे आली. स्वतः नियमितपणे बॅडमिंटन खेळणारे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी २००२ मध्ये सातारा जिमखान्याचे व सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सुधाकर शानभाग यांच्या पुढाकाराने पहिल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धाचे संयोजन सातारा जिल्हा बॅडमिंटन संसोसिएशन आणि सातारा जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने केले हेमंत जाजू, डी. व्ही. लोखंडे, जयदीप महाजनी, व्ही. एस. निंबाळर, संग्राम पाटील, सुरेश साधले, घन:श्याम शहा, सुजीत जगदामे, उत्कर्ष भोसले, जयदिप वाघ, रमेश मोरे, दिलीप पोळ, मिलींद शेलार, आदी आदी क्रीडाप्रेमींनी यात महत्वाचा वाटा उचलला मयूर घाणेकर, संकेत झोही, नितीन इंगोले, मयूर तावडे, भूषण आकूत, मिनीद घाटे, हिमांशु ठक्कर, कृपा तेलंग, ऋतूपर्ण कुलकर्णी, अर्चना देवधर, क्रांती साने, लीना पेडणेकर, विनया दोही, तिमतीम सलारीया या मान्यवर खेळाडू च्या सहभागाने हो स्पर्धा गाजली.
२००८ साली ज्यूनियर व सबज्युनियर गटाच्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन निवड स्पर्धा नव्याने विकसीत झालेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजीत करण्यात आल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ५०० पेक्षा जास्त नामवंत खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत रू ५५ हजारांची रोख पारितोषीके देण्यात आली होती कुणाल भिडे, श्वेता केळकर, प्रज्ञा गर्दे, कादंबरी छेडा, अनुराधा श्रीखंडे, सायली राणे, तन्वी लाड, गौरी घाटे, हर्षल दाणी, राधिक जोशी, स्नेहाल सावंत आदी राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, श्री सुधाकर प्रानभाग, राजदीप माजगावकर, राजा शाह, मनोज कान्हेरे, डी. व्ही नांगरे, सचिन देशमुख, सुरेश साधले, शहीद सय्यद, श्रीराम नांगरे, सचिन देशमुख, दिलीप पोळ, संग्राम पाटील, व्ही. एस. निंबाळकर आदी बॅडमिंटन प्रेमी मंडळीनी यशस्वीपाणे स्पर्धांचे संयोजन केले.
याच वेळी कराड येथे पण विविध राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजन होण्यास सुरुवात झाली राजाभाऊ कोटणीस स्मृती बॅडमिंटन स्पर्धा सातत्याने घेण्यात येतात.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यातर्फे ही राज्य बॅडमिंटन निवड स्पर्धाचे आयोजन यशस्वीपणे करण्यात येत आहे. महेश सटवे, निलेश फणसळकर, ओंकार पालकर त्यांचे सहकारी या स्पर्धेच्या नियोजनात महत्वपूर्ण कामगिरी बजावतात. श्रीराम बॅडमिंटन क्लबचे दिलीप पोळ, कराड शटल अकॅडमीचे निलेश फणसळकर, ओंकार पालकर व त्यांचे सहकारी या स्पर्धेच्या नियोजनात महत्वपूर्ण कामगिरी बजावतात. श्रीराम बॅडमिंटन क्लबचे दिलीप पोळ, कराड रंगसळकर, सातारले मनोज कान्हेरे, शरीफ सालानी असे अनेक जुन्या पिढीतील खेळाडू नवोदितांना मार्गदर्शन करत असतात त्यामूळे बॅडमिंटन खेळाचा प्रचार व प्रसार झाला असून सातारा जिल्ह्यात सातारा शहर, कराड, साखरवाडी,फलटण, वाई, पाटण आदी ठीकाणी बॅडमिंटन खेळणारे खेळाडू स्वतत्याने सराव करत असतात. अलीकडच्या काळात आर्या देशपांडेने खेलों इंडिया स्पर्धेत दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदाची कामगिरी केली. मनोज कान्हेरे हे महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक होते. मयूरी कान्हरेने शिवाजी विद्यापीठ संघाचे विजेतेपद सलग ४ वेळा पटकावले व तिचा अ. भा. विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली, हर्षल जाधव, सिद्धी जाधवने पण महाराष्ट्र संघाकडून अ. भा.शालेय अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग नोंदवला.

title

व्यवस्थापन

Shri. Chh. Shivajiraje S. Bhosale

Hon. President

Shri. Sudhakar S. Shanbhag

Hon. Vice President

teacher

Shri. Sachin S. Deshmukh

Hon. Vice President